July 14, 2024
Contact No.
Get Bright Future With Us

Admission Open Now!

* महाविद्यालयाच्या वेळा *

* रिष्ठ महाविद्यालय वर्ग सकाळी .१६ ते १२.०० पर्यंकनिष्ठ महाविद्यालवर्ग दुपारी १२.३० ते .०० पर्यंत 

* प्रवेश मिळण्यासंबंधी अटी* प्रवेश मिळण्याकरीता अर्ज करण्यापुर्वी या माहिती पत्रकातील नियम व अन्य माहिती काळजीपुर्वक वाचावी

) ज्यांना महाविद्यालयाच्या नियम अटी मान्य असतील त्यांनीच हा अर्ज भरावा.

) आवेदन पत्र विकत घेतले म्हणजे प्रवेशाची हमी नाही.

) प्रवेश देण्याचा नाकारण्याचा अधिकार प्रशासनास आहे.

) तसेच दिलेला प्रवेश कोणत्याही क्षणी रद्द करण्याचाही अधिकार महाविद्यालयीन प्रशासनास आहे. बोर्डाचे किंवा विद्यापीठ परिक्षेचे निकाल लागल्यापासून आठ दिवसा पर्यंर्ज स्वीकारले जातील. प्रवेश अर्जा सोबत शुल्क भरावे लागेल. (शुल्क तक्ता पहावा

प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहूआवश्यक त्या दाखल्यासह कार्यालयात दाखल रावा. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी आपले र्ज महाविद्यालयातून घ्यावे ११ वी कला किंवा वाणिज्य मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षातनाव असले तरी नवीन प्रवेश अर्ज भरुनदेणे आवश्यआहे

* प्रवेश अर्जासोबत लागणारेदाखले*

) नव्याने प्रवेश घेण्यासाठी

* वर्ग ११ वी १२ वी करीता दोन पासपोर्ट साईज फोटोग्राफ

* महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पासपोर्ट साईज फोटोग्राफ

* शाळा / महाविद्यालय सोडल्याचा दाखल (मुळप्रत)

* एस.एस.सी. परीक्षा / विद्यापीठ परीक्षा गुणपत्रिका (मुळप्रत व सत्यप्रत)

* बी.ए. भाग बी.कॉभाग यासाठी भाग च्या गुणपत्रिकेच्या प्रती

* प्रवेश फी अन्य शुल्क कार्यालयात भरल्यासंबंधी पावती

* अभ्यासात खंड पडला असल्यास संबंधीत अधिकाऱ्याचा दाखला

* अन्य विद्यापीठ अन्या बोर्डाची परिक्षा पास होवुन प्रवेश घेतल्यास मायग्रेशन 

सर्टिफिकेट लागेल. * विद्यार्थ्यांनी मुळ प्रत देण्यापुर्वी मुळ कागदपत्राच्या पुरेश्या झेरॉक्स काढून ठेवाव्यात.

* विद्यार्थ्यांना दरवर्षी नविन ओळखपत्र घ्यावे लागेल. * रेशनकार्ड झेरॉक्स * आधाकार्ड झेरॉक्स 

ब) मागील वर्षी या महाविद्यालयात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

* विद्यार्थी परीक्षा गुणपत्रिका (मुळप्रत)

* प्रवेश फी अन्य शल्क कार्यालयात भरल्या संबंधीची पावती

* प्रवेश मिळवु शकणाऱ्या मुलाखतीस बोलविलेल्या विद्यार्थ्यांची यादी सुचना फलकावर 

लावण्यात येईल. मुलाखतीस आलेल्या विद्यार्थ्यांमधुन निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल

परिक्षा शुल्क 

सोबत शुल्काचा तक्ता पाहावा.

अन्य विद्यापीठ अथवा बोर्डाची परीक्षा पास होवून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांस मायग्रेशन शुल्क रु १००/- भरावे लागेल. विद्यापीठ परीक्षा शुल्क ३० नोव्हेंबर २०२० पुर्वी कार्यालयात भरावे लागेल

शुल्क भरण्यासंबंधी सुचना ) कार्यालयात संबंधीत कर्मचारी यांचेकडे शुल्क स्विकारल्या जाईल. ) ७५ टक्के पेक्षा कमी हजेरी असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत बसता येणार नाही. 

तारण धन 

तारधन महाविद्यालय सोडल्याचा दाखला घेतल्यानंतर एका वर्षाच्या आत मिळु शकेल. विद्यार्थ्यांस ठराविक नमुन्यात अर्ज करावा लागेल

 

महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे नाव काढल्यापासुन एक वर्षाच्या आत तारधन रक्कम न घेतल्यास त्या नंतर ती मिळणार नाही. 

विद्यार्थ्यांकडुन काही रक्कम येणे बाकी असल्यास ती तारण धन रकमेतून वसुल केल्या जाईल.

विद्यार्थ्याची वागणुक असमाधनकारक असल्यास तारण धन परत मिळणार नाही.

वरिष्ठ महाविद्यालयात प्रथम प्रवेश घेणाऱ्यास तारण धन रु ५०/- भरावे लागेल.

* १२ व्या वर्गाच्या प्रथम प्रवेशास प्रवेश शुल्क रु १८/

* पदवी प्रमाणपत्र फी रु २००/

* गृहअर्थशास्त्र विद्यापीठ प्रात्याक्षिक परीक्षा शुल्क बी.. भाग ,करीता प्रत्येकी रु ४५/

* संगणक प्रात्याक्षिक परिक्षा शुल्क बी.कॉम.भा,करीता रु ४५/- व भाग करीता रु.९०( उपरोक्त शुल्कात विद्यापीठाच्या आदेशानुसार बदल होऊ शकतो. )

shulk aakarni

* प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक माहिती*

.शिस्त * विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या शिस्तीचे काटेकोरपणे पालन करावे.

* प्राध्यापक वर्ग इतर संबंधीत कर्मचाऱ्यांशी त्यांची वर्तणूक आदरपूर्वक असावी.

* विद्यार्थ्यांच्या परस्परांच्या संभाषणात वर्तवणूकीत सभ्यता असावी. * महाविद्यालयाच्या परिसरात गैरवर्तन गैरशिस्तपणाने वर्तणूक केल्यास विद्यार्थी कडक शिक्षेस पात्र ठरेल

* असभ्य गैर वर्तणुकीबद्दल विद्यार्थ्याला महाविद्यालयातुन काढून टाकण्यात येईल

तासीका सुरु होण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना वर्गात आपआपल्या जागी बसणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थीतीत कोणत्याही कारणास्तव चालु असलेले वर्ग महाविद्यालयाचे इतर कामकाज यात विद्यार्थ्यांच्या गैरवर्तणुकीमुळे अडथळा येता कामा नये. अन्यथा तो विद्यार्थीदंडास पात्र ठरेल

. उपस्थिती 

तासिकेला उशिरा आल्यास प्रवेश देणे प्राध्यापकाच्या इच्छेवर अवलंबुन राहील. एन.एस.एस. पी.टी. च्या तासाला ८० टक्के उपस्थिती आवश्यक असुन सर्व कार्यक्रमाला शिबीराला हजर राहणे आवश्यक आहे

.महाविद्यालयीनपरीक्षा 

वरिष्ठ महाविद्यालयात वर्षातुन दोन घटक चाचण्या एक सराव परिक्षा घेण्यात येतील. पुर्व परवानगी शिवाय परीक्षेला अनुपस्थित असलेल्या परीक्षेसंबंधी नियमाचे पालन करणाऱ्या अभ्यासात असमाधानकारक असलेल्या विद्यार्थ्यांचे नाव हजेरी पटावरुन कमी करण्यात येईल. पुर्व परवानगी मिळाल्या शिवाय गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रती पेपर दंड भरावा लागेल. परिक्षेत अनुचित साधनांचा वापर केल्यास दंड पडेल

चाचणी परिक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या किंवा बोर्डाच्या परीक्षेत बसण्याची परवानगी नाकारलीजावू शकते

* आवश्यक अभ्यासेत्तर उपक्रम * महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यास खालीलपैकी कोणत्याही एका उपक्रमास भाग घेणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज करतांना विद्यार्थ्यांनी निवड केलेल्या उपक्रमात खालील परिस्थतीत भागघेण्यास सुट मिळू शकेल. * ज्यांचे वय २५ वर्ष पेक्षा अधिक आहे. * विवाहीत मुले / मुली * अंतिम वर्ष विद्यार्थी * अपंग शारीरीक दृष्टया अपात्र * पाच मैला पेक्षा जास्त अंतराने येणारे विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांनी सुट मिळण्यासाठी १५ जुलै २०२० पुर्वी कार्यालयात अर्जदाखल करावा

.राष्ट्रीय सेवायोजना (एन.एस.एस.) 

फक्त १२० विद्यार्थ्यांना या पथकात प्रवेश मिळेल लोक सेवेची, श्रमाची, काम करण्याची तयारी आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या उपक्रमात भाग घेता येईल. पथकांनी आयोजित निरनिराळ्या कार्यक्रमात शिबीरात भाग घेणे आवश्यक आहे. याशिवाय ८० मुलींचे स्वतंत्रपथक राहील

.शारीरिक शिक्षण 

आठवडयातून दोन दिवस शारीरिक शिक्षणाचे वर्ग होतील. त्यात मुली भाग घेउ शकतील निरनिराळ्या प्रकारच्या शारीरिक शिक्षणक्रमाशिवाय अॅथलेटीक्सचे शिक्षण देण्याचीही व्यवस्था केली आहे. ठरविलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना उपस्थित राहावे लागेल. विद्यार्थ्यांना ठरविलेल्या गणवेशातच राहावे लागेल. निरनिराळे देशी विदेशी खेळ आयोजित केले जातील.चालु वर्षी खालील खेळ उपलब्ध होतील. .हॉलीबॉल, . कबड्डी, .खो-खो, . अॅथलेटिक्स, . योगासने, . क्रिकेट 

दरवर्षी खेळाच्या चमु जिल्हास्तरीय विद्यापीठस्तरीय सामन्यात भाग घेतात महाविद्यालयीन खेळाच्या वार्षिक स्पर्धा आयोजित करण्यात येतात विजेतांना बक्षिस प्रमाणपत्र दिले जाते

.शारीरिक कार्यक्षमताचाचणी 

विद्यापीठ नियमानुसार दरवर्षी सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनीकरीता शारीरिक कार्यक्षमता चाचणी परीक्षा आयोजित केली जाते. सर्व विद्यार्थ्यांनी या चाचणी परीक्षेला उपस्थित राहणे आवश्यक आहे. योग्य विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडुन प्रमाणपत्र दिली जातात

.ऐच्छिक अभ्यासेत्तर उपक्रम 

) सांस्कृतिक कार्यक्र - विद्यापीठ नियमानुसार वरिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी सभेची स्थापना होईल. विद्यार्थ्यांसाठी आयोजित प्रत्येक कार्यक्रमात प्रभारी प्राध्यापकांची नियुक्ती मा.प्राचार्य करतील. प्रभारी प्राध्यापक प्राचार्य विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमा संबंधी आवश्यक नियम ठरवतील या संबंधात प्राचार्यांचा निर्णय अंतिम राहील. कनिष्ठ महाविद्यालयात कुठल्याही प्रकारची निवडणुकया संबंधात होणार नाही. सांस्कृतिक कार्यक्रम प्रभारी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनातहोतील.त्यात अंतिम निर्णय प्राचार्यांचा राहील

) अर्घ्य वार्षिकांकाचे प्रकाशन - प्राचार्यांनी नियुक्त केले ल्या प्रभारी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली अर्घ्य वार्षिकांकाचे प्रकाशन होईल. प्रभारी प्राध्यापक विद्यार्थ्यांचे संपादक मंडळ नियुक्त करतील. विद्यार्थ्यांच्या साहित्याचे संकलन संपादन यासाठी प्रभारी प्राध्यापकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळेल. संपादन प्रकाशनासंबंधात 

अंतिम सर्व अधिकार प्राचार्यांचे असतील

.ग्रंथालय वाचनालय 

गंथालयातील पुस्तके मिळण्याची वेळ, पध्दती, ग्रंथालयासाठी पुस्तके मासिके खरेदी करणे इत्यादी संबंधी धोरण आखणे नियम तयार करणे या संबंधात विविध सुचना प्रसारित करणे याचे सर्वधिकार ग्रंथालय समितीस राहतील. प्रत्येक विद्यार्थ्याला एक 

ग्रंथालय पत्रिका मिळेल. प्रत्येकास एक वेळ एकच पुस्तक मिळेल. पुस्तक सात दिवसापर्यंत घरी ठेवतायेईल. त्यानंतर प्रत्येक दिवसाला रुपये /- प्रमाणे दंड आकारण्यात येईल. ती रक्कम पुस्तक परत करतेवेळी भरावी लागेल

पुस्तक चांगल्या स्थितीत परत करावे लागेल. पुस्तकावर काही मजकुर लिहीलेला आढळल्यास, पुस्तक फाडल्यास, खराब झाल्यास, हरवल्यास पुस्तकाची पुर्ण रक्कम रु ५० पोस्टेज वसुल करण्यात येईल. ग्रंथालय कार्ड हरविल्यास रु दंड भरुन कार्ड मिळु शकेल. पुस्तके १० मार्च पर्यंत विद्यार्थ्यांना ठेवता येतील. नंतर पुस्तक ठेवायचे असल्यास पुस्तकांची पुर्ण किंमत ५० रु पोस्टेज म्हणुन ठेव ठेवावी लागेल. चांगलया स्थितीत पुस्तके परत केल्यास ठेव परत मिळेल

ग्रंथालय मुला मुलींसाठी वाचन कक्षाची स्वतंत्र व्यवस्था आहे. विद्यार्थ्यांनी वाचनालयात शांतता राखावी सकाळी १०.३० ते १२.३० पर्यंत वर्तमान पत्र वाचावयास उपलब्ध राहतील. ग्रंथालयात विद्यालयात ओळखपत्र गणवेश अनिवार्य राहील

.आरोग्य चिकित्सा 

विद्यापीठाच्या नियमानुसार दरवर्षी प्रत्येक विद्यार्थ्यांची आरोग्य चिकित्सा महाविद्यालयाच्या अधिकृत वैद्यकिय अधिकाऱ्याकडुन होईल. त्या संबंधी सुचना दिल्या जाईल. अनुपस्थित विद्यार्थ्यांना ५०रुदंड भरावा लागेल. आरोग्य चिकित्सा प्रमाणपत्राच्या अभावी विद्यार्थ्यांस विद्यापीठ परीक्षेला बसता येणार नाही

. माहिती मार्गदर्शन केंद्र 

शिक्षण पुर्ण केल्यानंतर नोकरी, व्यवसाय किंवा पुढील कोर्स या बाबत विद्यार्थ्यां ना अमरावती विद्यापीठाव्दारे प्रकाशित झालेली माहिती दिल्या जाते. मुंबई येथील व्यवसाय मार्गदर्शन केंद्राशी या केंद्राचा संपर्क राखला जातो. त्याचा फायदा येथील विद्यार्थ्यां नाघेतायेणे शक्य झाले आहे

. आर्थिक शिष्यवृत्ती (.बी.सी. सवलत

ज्या विद्यार्थ्यांच्या पालकाचे किंवा कुटुंबाचे सर्व मार्गाने असणारे एकुण वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत आहे तो विद्यार्थी स्वतः नोकरी करीत नाही अशा विद्यार्थ्यांस महाराष्ट्र सरकार कडुन संपुर्ण वर्षाचे शिक्षण शुल्क, प्रवेशशुल्क,ग्रंथालयशुल्क मिळू शकते. यासाठी विशिष्ट नमुन्यात अर्ज भरुन सर्व दाखल्यासह प्रवेश घेतल्यापासुन १५ दिवसाच्या 

आत कार्यालयात जमा करावा

विद्यार्थ्यांची सर्व विषयात ७५ प्रतिशत पेक्षा कमी उपस्थिती राहिल्यास त्या सत्राचे शिक्षणशुल्क सरकारकडुन मिळणार नाही

ते शुल्क विद्यार्थ्यास परीक्षेच्याआधी जमा करावे लागेल. अर्जातील तपशिल अथवा उत्पन्नाच्या माहितीत दोष आढळल्यास ही सवलत रद्द होईल. यासाठी विद्यार्थी स्वतःजबाबादार रहील. या संबंधात महाविद्यालयातील सुचना फलकावर वेळोवेळी सुचना दिल्या जातील

ज्या विद्यार्थ्यांना .बी.सी. सवलत आहे जो विद्यार्थी एस.एस.सी. परीक्षेत पहिल्याच प्रयत्नाने शेकडा ४६ पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाल अशा विद्यार्थ्यांना ही सवलत मिळु शकते अर्ज करण्याची शेवटची तारीख १५//२०२०ही आहे

.एस.सी./एन.टी./व्ही.जे.एन.टी./एस.बी.सी./.बी.सी./एस.टी. स्कॉलरशीप  

भारत सरकारची ही शिष्यवृत्ती एस.सी./एन.टी./व्ही.जे.एन.टी./एस.बी.सी./ एस.टी. इतर मागासलेल्या जातीतील ओबीस विद्यार्थ्यांना मिळू शकते. शिष्यवृत्ती करीता करावयाचा अर्ज १५//२०२० च्या आत कार्यालयात जमा झाला पाहिजे. शिष्यवृत्तीची रक्कम मिळाल्यावर शिक्षण शुल्क, प्रवेश विद्यार्थ्याकडुन इतर घेणे असलेली रक्कम कमी करुन बाकी रक्कम विद्यार्थ्यास दिली जाईल. चांगली वर्तणुक, आवश्यक उपस्थिती अभ्यास इत्यादी कसोटीस विद्यार्थी उतरल्यास पुढील वर्षी ही शिष्यवृत्ती मिळणार नाही. तसेच शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकेत आपले खाते काढावे लागेल. त्या खात्याचा नंबर महाविद्यालयात जमा केल्यावरच शिष्यवृत्ती मिळेल. आधार कार्ड नंबर आवश्यक आहे खाते चालु असल्याची बँक पावती द्यावी

१०. स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती 

स्वातंत्र संग्रामातील सैनिकांच्या मुलामुलींसाठी महाराष्ट्र सरकारव्दारे शिष्यवृत्ती मिळू शकते यासाठी ठराविक नमुन्यात अर्ज करण्याची अंतिम तारीख १५//२०२० पर्यंत 

आहे

११.ओपन मेरीट स्कॉलरशिप 

ज्या विद्यार्थ्यांना एस.एस.सी. परीक्षेत ६० प्रतिशत पेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप साठी योग्य माहितीसह १५//२०२० चे आत अर्ज दाखल करणे जरुरीचे आहे. शिष्यवृत्ती मिळण्यासाठी दरवर्षी प्रथम श्रेणीत यशस्वी होणे 

आवश्यक आहे

१२.नॅशनल लोन स्कॉलरशिप 

प्रथम व्दितीय श्रेणीत पास झालेल्या हुशार निवडक विद्यार्थ्यांना केंद्र सरकार कडुन कर्ज रुपाने ही स्कॉलरशीप मिळु शकते. दि. १५//२०२० पुर्वी माहिती दाखल्यासह अर्ज कार्यालयात दाखल करणे जरुरीचे आहे. कर्जाची रक्कम शासन नियमानुसार मिळेल. विद्यार्थ्यास प्रत्येक परीक्षेत व्दितीय श्रेणीत पास होणे आवश्यक आहे. अंतिम वर्षा पर्यंत हे कर्ज मिळत राहुन शिक्षण पुर्ण झाल्यावर कर्जाच्या रक्कमेची परत फेड करावी लागेल

१३. अपंग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती शारीरीक अपंगत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांसही शिष्यवृत्ती शासन नियमानुसार मिळु शकेल. दि. १५//२०२० पुर्वी ठराविक नमुन्यातील अर्ज आवश्यक दाखल्यासह कार्यालयात स्विकारल्या जातील

१४.प्राथमिक शिक्षकांच्या मुलामुलींना शिष्यवृत्ती  गुणानुक्रमे काही निवडक विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकार व्दारे ही शिष्यवृत्ती मिळु शकते या संबंधी माहितीघेतायेईल

१५.यशवंतराव चव्हाण महराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अभ्यास उपकेंद्र 

महाविद्यालयात पारंपारीक विद्यापीठाबरोबरच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यास उपकेंद्राव्दारे विभीन्न कारणाव्दारे शिक्षणापासून वंचित 

राहिलेल्यांसाठी बी../बी.कॉम.चे शिक्षणक्रम राबविल्या जातात

* काही महत्वाच्या सुचना* * सुचना फलकांवर लावण्यात येणाऱ्या सुचनांची विद्यार्थ्यांनी काळजीपुर्वक दखल घ्यावी. * वर्गातील फर्निचर महाविद्यालयाच्या परिसरातील साधनसामुग्री इत्यादींचा अयोग्य वापर केल्यास त्याचे नुकसान झाल्यास भरपाई करुनघेण्यात येईल

* प्राचार्य, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, ग्रंथालय यांचा आदेश सुचनांवर अनादर झाल्यास गैरवर्तणुक कृत्य समजल्या जाईल योग्य ती कारवाई करण्यात येईल. * विद्यार्थ्यांना महाविद्यालयात मोबाईल फोन वापरता येणार नाही. विद्यार्थ्यांजवळ मोबाईल फोन सापडल्यास त्याचे मोबाईल जप्त करण्यात येतील या संदर्भात संपुर्ण 

जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील. * प्रत्येक विद्यार्थ्यांना नेमुन दिलेला गणवेश अनिवार्य राहील. जीन्स पॅन्ट हा गणवेशाचा भागनाहीयाची गंभीर नोंद घ्यावी

अमरावती विद्यापीठ 

विद्यापीठ नियमासंबंधी माहिती - महाविद्यालयात अथवा पदव्युत्तर शैक्षणिक विभागातील प्रवेश घेतांना विद्यापीठाचे नियम परिनियम सर्व दुरुस्त्यांसह माहिती करुन घेणे आवश्यक आहे

 

अध्यादेशक्रमांक * विद्यार्थ्यां चे नामांकनासंबंधी * विद्यापीठाच्या प्रवेशाबाबत * राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी होण्याबाबत * विद्यार्थ्यांचे शारीरीक स्वास्थकल्याण * सुट सवलत पुढील वर्गात प्रवेश * विद्यापीठ शुल्क संबंधी माहिती मिळण्याबाबत. * पदवी करीता विद्यार्थ्यांचा प्रवेश * विद्यापीठाच्या दस्तऐवजामध्ये नाव बदल्यासंबंधी * प्रोत्साहनात्मक गुणासंबंधी उपरोक्त माहिती संबंधीत प्रभारी कर्मचारी तसेच अधिक्षक यांचे जवळुन प्राप्त करुन घ्यावी